बीएचआर’चे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर छापा !
जळगाव (प्रतिनिधी)। येथील बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी शिवाजी नगरमधील जितेंद्र कंडारे यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. परंतू कंडारे घरी नसल्यामुळे आयकर विभागाचे पथकाने काय तपासणी केली याची माहिती मिळू शकली नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची तपासणी सुरूच असून तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे याची माहिती मिळू शकली नाही. तर पथकातील सदस्य देखील काहीही माहिती द्यायला तयार नव्हते. दरम्यान, भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता. त्यानंतर बीएचआर या अवसायानात असलेल्या सोसायटी विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता.