बेकायदेशीर दारु विक्री करण्या प्रकर्णी फेकरी येथे एकाला अटक !
भुसावळ (प्रतिनिधी) । महाराष्ट्रात बऱ्याच ठिकणी लॉकडाऊन चालू असताना भुसावळातही लॉकडाउन असल्याने बेकायदेशीर देशी दारूची विक्री करण्या प्रकरणी एका इसमास अटक करण्यात आली असून तालुक्यातील फेकरी येथे संशयित आरोपी सोमा काशीनाथ भटकर हा देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची भुसावळ तालुका पोलीसांना माहिती मिळाली होती, त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, पोहेकॉ विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख, अर्चना अहिरे, शिवाजी खंडारे, प्रेमचंद सपकाळे, मजीद पठाण यांनी कारवाई करत संशयित आरोपी भटकर याला अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १२ हजार ४७२ रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तालुका पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोंदकरणयात आला आहे.