बोदवड येथे आठवळे बाजार भरवल्या प्रकरणी 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल !
बोदवड (प्रतिनिधी)। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन लागु असतांना बोदवडला 1 जुलैला सकाळी आठवडे बाजार भरवुन नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्याने येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात उपनगराध्यक्षांच्या बंधूंचा समावेश आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार कलम १४४ प्रमाणे सध्या कोरोना संसर्गा पासून नागरिकांचे संरक्षणासाठी जिल्हा बंदी, जमाव बंदी, संचार बंदी, लागु असताना आदेशाच पालन न करता सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून मानवी आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृत्य करून आदेशाच उल्लंघन केल्याने बोदवड नगरपंचायतचे कार्यलयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या फिर्यादी वरून आरोपी उपनगराध्यक्षांचा भाऊ योगेश नारायण माळी (वय ३५) यांच्यासह शाहरुख खान मज्जीद खान, आर. एन. बागवान, सै अरबाज सै रहीम बागवान व रामदास रामचंद्र तुरे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कालीचरण बिर्हाडे करीत आहेत.