बोरावल गेट भागात गटारीचे बांधकाम होणार आमदार शिरीषदादा चौधरी यांनी घेतली तक्रारीची दखल !
यावल(प्रतिनिधी)दि.30।
यावल शहरातील बोरावल दरवाजा भागात पावसाळ्याचे पाणी गटारी अभावी सरळ नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी वार्डातील तरुण पदाधिकारी कार्यकर्ते राकेश करांडे यांच्याकडे आल्याने या तक्रारीची दखल आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तात्काळ घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तात्काळ गटारीचे काम करण्याच्या सूचना आज दिनांक 30 जून 2020 मंगळवार रोजी दुपारी दिल्या. यावल शहरातील बोरावल दरवाजा भागातील नागरिकांच्या घरात पावसाळ्याचे पाणी शिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी भावी नगरसेवक आणि आमदार शिरीषदादा चौधरी यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ता राजेश करांडे याना फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून केल्या होत्या
आणि आहेत
त्यामुळे राजेश करांडे यांनी व यावल पंचायत समिती काँग्रेसचे गटनेते शेखरदादा पाटील यांच्या माध्यमातून आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे पाठपुरावा करुन बोरावल गेट भागात नगरपालिकेतर्फे किंवा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तर्फे गटारीचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
याबाबत आमदार चौधरी यांनी आज दिनांक 30 मंगळवार रोजी दुपारी सार्वजनीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निंबाळकर यांना बोरावल दरवाजा परिसरात तात्काळ बोलावून घेतलं व प्रत्यक्ष बोरावल रस्त्यावरील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या व रस्त्याच्या बाजुला तात्काळ 8 दिवसांत रुंद गटारीचे बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या, यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सोबत यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, राजेश करांडे, चेतन करांडे, चेतन पाटील, यश पाटील , अक्षय फेगडे , अक्रम तडवी , इस्माईल तडवी , बशीर पटेल , अलमोद्दीन तडवी , गंभीर पटेल व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.