भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

बौद्ध स्मशानभूमीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम !

वडगाव ता.रावेर (प्रतिनिधी)। मौजे वडगाव निंभोरा रोड वरील बौद्ध समाजाच्या लोकांसाठी असलेल्या स्मशानभूमीत ग्रामपंचायत वडगाव मार्फत अवैधरित्या सार्वजनीक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे.

सदर बांधकामासंदर्भात बौद्ध समाजातील लोकांनी अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायतीने व ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे सदर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम बंद करून ते अन्य ठिकाणी करण्यात यावे या संदर्भात दिनांक 22.6.2020 रोजी बौद्ध समाजातील बांधवांन मार्फत ग्राम विकास अधिकारी वडगाव यांना तक्रार अर्ज देण्यात आलेला होता परंतु त्या अर्जावर समाज बांधवांना कुठलीही माहिती न देता कुठल्याच प्रकारची कार्यवाही न केल्याने दिनांक 10. 8. 2020 रोजी स्मरण पत्र देण्यात आले तरीसुद्धा त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा खुलासा देण्यात आलेला नाही. तसेच दिनांक 30.06.2020 रोजी माननीय गटविकास अधिकारी रावेर यांना सदरील तपशिलाचा तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे त्यांनीदेखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे जागेचा तपशील भूमापन क्रमांक 324 /अ /1 असा असुन ती जमीन हरिजन लोकांच्या स्मशान भूमीसाठी राखीव आहे तसेच या जागेत अनेक दशकापासून प्रेत ही पुरलेले असून बौद्ध बांधवांच्या भावनेचा प्रश्न आहे. ग्रामसेवकांना व संरपच तसेच ग्रा.पं.सदस्य यांना ही माहिती माहित असल्यावर सुद्धा त्यांनी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम चालू ठेवल्याने बौद्ध समाजबांधवांच्या भावनेशी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने खेड केला असुन भावना दुखावल्या आहे असे मत बौद्ध समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!