ब्रेकिंग#अरे बापरे … ! जळगाव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित रुग्ण !
जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असुन त्यात जिल्ह्यात आज 132 नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या आता 2281 वर आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 18, भुसावळ 6, अमळनेर 2, चोपडा 27, पाचोरा 5, भडगाव 18, धरणगाव 3, यावल 5, एरंडोल 4, जामनेर 2, जळगाव ग्रामीण 6, रावेर 8, पारोळा 13, चाळीसगाव 7, मुक्ताईनगर 2, दुसर्या जिल्ह्यातील-2 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2281 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.