ब्रेकिंग:कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार ,
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,(निशाद साळवे)। पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे ,राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये या करता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी करण्यासाठी नाशिक मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अनेक कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते. यामुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेता नाशिक महा पालिकेने असा निर्णय घेतला आहे की, नाशिकच्या कोव्हिड रुगणालयां मध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे हा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार, दंड आकारल्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णांना भेट देणे सुरूच ठेवले तर थेट गुन्हा दाखल केले जाणार आहेत. शहरात झाकीर हुसेन, बिटको रुग्णालय याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांकडून गर्दी केली जाते, त्यातून संक्रमण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना जेवण देण्यासाठी त्याचप्रमाणे इतर कारणांसाठी नातेवाईक रुग्णांना भेटतात, हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर म्हणून काम करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होते आणि त्यामुळे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढते. किंवा हे नातेवाईक विषाणूसाठी कॅरिअर म्हणून काम करतात आणि त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढते.आयुक्तांनी असे आदेश दिले आहेत की संबंधित पोलीस स्टेशनचे इनचार्ज आणि विभागीय अधिकाऱ्यांनी या हॉस्पिटल्समध्ये भेट द्यावी.रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या जेवण आणून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन त्यांनी केल आहे.नाशिकमध्ये सोमवारी नवीन कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली होती तर बरे होण्याची टक्केवारी देखील लक्षणीय वाढली होती. सोमवारी जिल्ह्यामध्ये दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 3683 रुग्णांनी झाली वाढ झाली असून 4382 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सोमवारी दिवसभरात 34 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची आकडेवारी 3 हजार 345 वर गेली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातही लक्षणीय सुधार पाहायला मिळाला तरी नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट कायम आहे. शहरात दिवसभरात 2014 नवे बाधित आढळून आले तर 9 जणांनी आपले प्राण गमावले .