भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्य

भयानक पण सत्य! जिवंतपणी बेड्स मिळेना अन् मृत्यूनंतर स्मशानात जागा …..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

कल्याण (प्रतिनिधी) । कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने त्या रुग्णांना बेड,इजेक्शन, ऑक्सिजन, प्लाझ्मा वेळेवर न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. जीवनात पाणी ही परिस्थिती तर मृत्यू नंतर ही स्मशान भुमीत मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नाही, तीन-तीन ,चार-चार तास थांबून रहावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील जाणिव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय विठोबा भापकर यांच्या 60 वर्षीय मातोश्री यांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवार 24 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रात्री साडेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला.

त्या नंतर कल्याण पूर्व मधील  विठ्ठल वाडी स्मशान भूमी मध्ये रात्री 2 वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला.मात्र तेथील कर्मचारी कार्यालयास टाळे बघुन सर्वानाच धक्का बसला,तेथील कर्मचारी कार्यालय बंद करून घरी निघून गेले होते. संजय भापकर समवेत त्याच्या नातेवाईकांनी तेथे बोर्डवर लिहलेल्या नंबर वर संपर्क साधला मात्र कोणीही फोन उचलत नव्हते. एकीकडे 24 तास स्मशान भूमी सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली जाते ती फक्त कागदावरच का? शेवटी पहाटे चारच्या सुमारास गॅस दाहिनीच्या ऑपरटेरने फोन उचलला. त्यांनी सांगितले की, सकाळ पासून सात मृतदेहांचे दहन केल्याने मशिन खूप गरम आहे. आता मृतदेह मशिममध्ये ठेवला तर, मशीन खराब होण्याची दाट शक्यता आहे.तुम्ही लाकडावर दहन करा. अन्यथा सात वाजेपर्यंत मी येतोय तोवर थांबा असा सल्ला संजय भापकर आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. अखेर ते साडेपाचच्या सुमारास स्मशान भूमीत आले. एकीकडे मातोश्री च्या मृत्यूचे दु:ख तर दुसरीकडे अंत्यसंस्काराला लागणारा विलंब याचा कुटुंबीयांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!