भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

भाजपा सावदा तर्फे जळगाव उपमहापौरांचा निषेध

सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा| जळगाव शहर महानगरपालिकेच्या झालेल्या सभेमध्ये उपमहापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कुलभूषण पाटील यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या पेक्षा रावणाचं उदातीकरण होण्याच्या उद्देशाने अपमान जनक वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सावदा शहर व तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या नागरिकांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे कुलभूषण पाटील यांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असल्याने तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून कुलभूषण पाटील यांचे वर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, माजी नगराध्यक्ष सौ हेमांगी चौधरी, उपाध्यक्ष नितीन खारे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले, सागर चौधरी, प्रतीक भारंबे, अमित महाजन, संजय तेली, गजानन भार्गव, संजय चौधरी, गुणवंत वायकोळे, सर्वेश लोमटे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!