भारतानंतर हे देशही TikTok सारख्या चीनी App वर बंदी घालण्याच्या तयारीत!
नवी दिल्ली: मोदी सरकारने TikTok सह इतर अनेक चीनी Apps वर बंदी घातल्यानंतर आता जगभरातील देशांमध्ये चीनविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी मंगळवारी ट्विट केले की, अमेरिका सरकार प्रसिद्ध लोकप्रिय आणि सर्वाधिक युजर्स असणाऱ्या TikTok सह इतर चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ऑस्ट्रेलियानेही टिक-टॉकसह अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणण्याविषयी सांगितले होते. टिक-टॉकचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. फक्त टिक-टॉकचे २०० कोटी युजर्स होते. टिक-टॉकसह सर्व ५९ चिनी अॅप्सने भारतात बॅन केले आहे. यामुळे या सर्व कंपन्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.
US Secretary of State Mike Pompeo says that the United States is "certainly looking at" banning Chinese social media apps, including #TikTok: Reuters
(file pic) pic.twitter.com/fUzJKlQkSk— ANI (@ANI) July 7, 2020
ऑस्ट्रेलियातही Tiktok होऊ शकते बॅन!
ऑस्ट्रेलियात देखील सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर बंदी आणण्याची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचा असा विश्वास आहे की, टिकटॉक सारख्या चिनी सोशल मीडिया अॅप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत आणि युजर्सची माहिती चीनबरोबर शेअर करतात. ऑस्ट्रेलियामध्ये टिकटॉकचे १६ लाख युजर्स आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाचा असा विश्वास आहे की, चीनच्या बाईटेडान्सच्या मालकीचे टिकटॉक ऑस्ट्रेलियाच्या लोकांकडून डेटा जमा करक असून सर्व माहिती चीनमधील सर्व्हरमध्ये साठवली जात आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सुरक्षेस मोठा धोका निर्माण होऊ शकतो.