भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळात विमल गुटख्याची चोरटी विक्री करणारे दोघे जण ताब्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी)। शहरामधील खडका रोड फिरदोस दुध हेअरी समोरील एक पान टपरीमधील दोन इसम हे विमल गुटखा पान मसाला व तंबाखु कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत असल्याने दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिनांक २१/१२/२०२० रोजी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना भुसावळ शहरामधील खडका रोड फिरदोस दुध हेअरी समोरील एक पान टपरीमधील दोन इसम हे विमल गुटखा पान मसाला व तंबाखु कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत आहे.अशी गोपनीय बातमी मिळाल्याने सपोनि मंगेश गोंटला यांना बोलावून सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार मिळालेल्या माहीतीची खात्री करण्याकरीता स.पो.नि.श्री.मंगेश गोंटला,पो.शि./२९९४ विकास सातदिवे,पो.शि.७६१ चेतन ढाकणे,पो.शि./३३९८ प्रशांत परदेशी असे पंचनाम्याकरीता आवश्यक असलेल्या साहीत्यासह सरकारी वाहनाने खडका रोड फिरदोस दुध डेअरी समोरील भागात पोहचलो.तसेच मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार समिर पान मसाला या पानटपरीवर दुपारी ४.२० वाजता छापा टाकला.सदर टपरीत हजर इसमास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १] तौफिक खान लूकमान खान वय ३१ वर्षे, धंदा-मजुरी,रा. खडका रोड,लाल बिल्डीग जवळ,भुसावळ ता – भुसावळ. जि.जळगाव २| शेख शोएब शेख मनु वय २८ वर्षे, धंदा मजुरी,रा.खडका रोड, लाल बिल्डीग जवळ, भुसावळ असे सांगून त्यापैकी तौसिफ हा नमुद टपरीचा मालक असल्याबाबत कळविले.सदर टपरीची बारकाईने तपासणी केली असता ४,३५६ रुपये किंमतीचा केशरयुक्त विमल पान मसाल्याचे २२ पाकिटे ९६८ रुपये किंमतीचा व्ही-१ सुगंधीत तंबाखुचें ४४ पाकिटे टपरीत गुटखा व सुगंधी पान मसाला मिळून आला म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ९७८ भा.द.वि. कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!