भुसावळ सिंधी कॉलनी भागात सट्टा दुकानावर छापा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ (प्रतिनिधी)। शहरातील सिंधी कॉलनी भागात ५ मार्च २०२१ रोजी टाईम बाजार नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळविणाऱ्यास बाजारपेठच्या पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ५ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील सिंधी कॉलनी भागातील आदर्श हायस्कुलच्या पाठीमागे बडा सेवा मंडळ जवळ आरोपी रोहित धर्मेंद्र पारेचाणी वय २७ रा. सिंधी कॉलनी मधील असून हा लोकांकडून बिट आकडेवर पैसे स्वीकारून टाईम बाजार नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवितांना १५१० रुपये व सट्टा खेळण्याचे साधनासह आढळून आल्याने पोकॉ सुभाष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धुमाळ,पो. ना. रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोशि बंटी कापडणे, करतारसिंग परदेशी, सुभाष साबळे, आदी पथकाने केली आहे.