भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्यायावल

मंडे टू मंडे इम्पॅक्ट ! अखेर त्या मद्यधुंद पोलिसांचे निलंबन !

जळगाव (प्रतिनिधी)।  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जि.प.जळगांव गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे वाहन अडवून 2 मद्यधुंद पोलिसांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ही धक्कादायक घटना बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर यावल पोलीस स्टेशन पासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती, जळगाव येथील दोन्ही पोलिसांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटने संदर्भात मंडे टू मंडे ने सकाळी बातमी प्रसिद्ध केली होती, सदर वृतांची दखल घेत निलंबनाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

शुक्रवार दि.10 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद गट नेता प्रभाकर आप्पा सोनवणे हे आपल्या वाहनाने ( वाहन क्र. एम. एच. 19 ए. डब्ल्यू . 3434 ) यावल कडून आपल्या घरी वढोदे या गांवी जात होते यावल मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने कार मधून ( कार क्र.एम.एच.19 बी.यू . 0260 ) असलेले पोलीस कॉन्स्टेबल 416 जितेंद्र रोहिदास पांडव व हेमंत प्रमोद सोळुंके ( पोलीस मुख्यालय जळगाव ) यांनी प्रभाकर सोनवणे यांचे वाहन अडवले होते तसेच हातात काठी घेऊन शिव्या देत चालक सुनील बिरारी आणि प्रभाकर आप्पा सोनवणे यांना धमकावले होते सोनवणे यांच्याकडून त्यांना बराच समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु दोघ पोलीस दारूच्या नशेत तर्र असल्याने त्यांनी सोनवणे यांना दमदाटी आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता दोघ मद्य धुंद पोलिसांना ताब्यात घेतले याप्रकरणी चालक सुनील बिरारी यांच्या फिर्यादीवरून त्या दोघ पोलिसांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला कलम 279,504,506,34 प्रमाने भादवी मोटार व्हीकल कायदा कलम १८४ १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या घडलेल्या घटनेतील मद्यधुंद पोलीस कर्मचारी जितेन्द्र रोहीदास पांडव आणी हेमंत प्रमोद सोळंके यांनी मद्यधुंद अवस्थेत केलेली बेशिस्त वागणुकीबद्दल त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठण्यात येत असल्याची पोलीस सुत्रांकडुन माहीती प्राप्त झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!