मंदिर बंद च्या विरोधात रावेर भाजपाचे लाक्षणिक उपोषण
रावेर (प्रतिनिधी)। राज्यात बार सुरू आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाच्या विरोधात आणि मंदिरे तात्काळ उघडावी या मागणी साठी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी च्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
आघाडी सरकारच्या विरोधात मंदिर बंद या काळ्या निर्णयाचा विरुद्ध मंदिरानं समोर उपोषण करण्यात येणार असून त्या नुसार रावेर भाजपाच्या वतीने तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर मंदिर,तामसवाडी येथे उद्या दि १३/१०/२०२० मंगळवार रोजी ११ ते २ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तरी सर्व भा.ज.पा. लोकप्रतिनिधी, जी.प.सदस्य प. स. सदस्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ,रावेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस सी एस पाटील ,व तालुका सरचिटणीस महेश चौधरी यांनी केले आहे.