मतदार संघात 30 हजार सभासदांच्या नोंदणीचा निर्धार– रोहिणी खडसे
तासखेडा ता.रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील तापी काठावर असणाऱ्या भिल्ल वस्ती लूमखेडा, लूमखेडा, रणगाव,तासखेडा,गहूखेडा, सूदगाव,रायपुर या गावांमध्ये राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.
गेल्या 15 ऑगस्ट पासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस संवाद यात्रे दरम्यान गावागावातील ग्रामस्थांकडून विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून नाथाभाऊ यांनी त्यांच्या कार्यकाळात तापी काठावरील प्रत्येक गाव चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले प्रत्येक गावात अंतर्गत काँक्रीटीकरण, सभागृह, व इतर मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आगामी काळात सुद्धा नाथाभाऊ यांच्या माध्यमातून राहिलेले विकास कामे पूर्ण करण्यात येतील या यात्रेत आबालवृद्धासह युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या निमित्ताने नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 30 हजार सभासद नोंदणी करण्याचा निर्धार केल्याचे रोहिणी खडसेंनी सांगितले.
रोहिणी खडसेंनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोणतेही संविधानिक पद नसताना त्या जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी गावोगाव जात आहेत आपण मांडलेल्या समस्या एकनाथराव खडसे आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.या निमित्ताने 30 हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले असून नवीन सदस्य होण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रयत्न करण्याचे उपस्थित कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी राजेश वानखेडे, रमेश नागराज पाटील, निळकंठ चौधरी, यु डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यात्रेत जि प सदस्य कैलास सरोदे, बाजार समिती संचालक पंकज येवले, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, जेष्ठ नेते हेमराज पाटील, सचिन पाटील, रामभाऊ पाटील,योगिता वानखेडे, शांताराम पाटील, गोपी पाटील, मधुकर पाटील, कमलाकर पाटील, शशांक पाटील,योगेश्वर कोळी, अमोल महाजन, सिद्धार्थ तायडे, भागवत कोळी, भुषण चौधरी, श्रीकांत चौधरी, वाय डी पाटील, दिपक कोळी, गजानन लोखंडे, किशोर पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भाल शंकर, नंदू हिरोळे, भुषण पाटील, चेतन राजपूत, भुषण धनगर,रोहन च-हाटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते.