मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पाडळसे ता,यावल (प्रीतिनिधी)। पाडळसे येथील एक अल्पभूधारक शेतकरी सकाळी शेतामध्ये गाई चारायला गेले असता मधमाश्यानी हल्ला चढवला यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक असे, पाडळसे येथील शेतकरी भागवत भास्कर काठोके हे अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून ते गाईचा व्यवसाय करायचे नेहमी प्रमाणे दि.११ रोजी ते सकाळी शेतामध्ये गाई चारायला गेले असता दुपारी ३ वाजता झाडावरुन अचानक त्यांच्यावर मधमाश्या नी हल्ला चढवला (आगे मोहोळ) यामध्ये ते गंभीर जखमी झाले पुढील उपचारासाठी त्यांना भुसावळ येथे ॲडमिट करण्यात आले होते त्यांचे आज दिनांक 13 रोजी दुःखद निधन झाले भागवत काठोके है जन्मापासून मूके होते त्यांच्या घरामध्ये ते एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या पदावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक विवाहित मुलगा व पत्नी असा परिवार आहे स्व गोपीनाथजी मुंडे अपघात योजनेतून शासनाने लाभ मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.