भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मलकापुर येथे रासप व प्रहार तर्फे वीज बिलांची होळी !

अमोल बावस्कर

मलकापूर( प्रतिनिधी)। महावितरण क्या अवाजवी बिलांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीच्या मलकापूर येथील विभागीय कार्यालयावर निषेध आंदोलन विज बिल दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन देऊन विज बिलांची होळी करण्यात आली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व नागरीक घरातच होते.मागील 3 महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने शहरांसह राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे.त्यामुळे बर्याच संघटनानी लॉकडाऊनच्या काळात विज बिल माफी करण्याची मागणी केली होती. असं असतानाच आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे. लहान मोठ्या शहरातील सुध्दा ऊद्योग धंदे बंद पडल्यामुळे बर्याच लोकांवर ऊपासमारीची वेळ आलेली आहे.
कामच बंद असल्याने अनेक लोकांच उत्पन्नाचं साधनंही हिरावलं गेलं. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच वीज महामंडळाने पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे. वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रिडींग घ्यायला गेलेच नाहीत. रिंडींग घेतले नसले, तरी महामंडळाने अगदी अंदाजपंचेच बील तयार करुन ग्राहकांना पाठवले आहेत. लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.

आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी 1100 रुपये बील येत असेल, तर त्याला 11000 रुपये बील आकारले गेले आहे. बिलाची आकारणी करताना मुद्दाम ग्राहकाला स्लॅबच्या बाहेर ठेवून कशाप्रकारे जास्त आकारणी करता येईल अशी जाणीवपूर्वक योजना करून बिल तयार करण्यात आलेले आहेत. लॉकडाउनच्या काळातही सामान्य माणसाचे शोषण करण्याचा फार्मूला महावितरणने काढला असून हा मृताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे आहे त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. वीज ग्राहकांच्या याविषयी असंख्य तक्रारी आहेत.

ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तिथे गर्दी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीच कोरोना हॉस्पॉट असलेल्या मलकापूर शहरात अशाप्रकारची गर्दी व त्या माध्यमातून संसर्ग होऊ नये यासाठी महावितरणने घरपोच जाऊन सर्व ग्राहकांची बिले दुरुस्ती करून ती कमी करून देण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष भैरव फौंडेशन महाराष्ट्र , जन अन्याय निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जातील देण्यात आला सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप ,प्रहार उपजिल्हा प्रमुख अजय टप, शहर प्रमुख शालीकराम पाटील, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, बलराम बावस्कार, संतोष जाधव, उमेश जाधव, भैरव फाऊंडेशनचे विजय वानखेडे, प्रा.प्रकाश थाटे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!