महायुतीचे 24 ते 25 पदाधिकारी कार्यकर्ते विरुद्ध गुन्हा दाखल, यावल येथे रस्ता रोको वाहन अडविण्याचा विपरीत परिणाम !
यावल (प्रतिनिधी)। दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी सकाळी 11:10 ते 11: 30 वाजेच्या सुमारास यावल शहरात यावल ते फैजपूर, भुसावळ –चोपडा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत टी पॉईंट भागात महायुतीचे एकूण 24 ते 25 कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करून येणारे जाणारे वाहन अडवून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कोरोना कोविड–19 चे नियमाचे उल्लंघन केले म्हणून 24 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध यावल पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला.
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी काल सकाळी 11:10 ते 11:30 वाजेच्या सुमारास यावल येथे भुसावळ टी पॉइंट जवळ रस्ता रोको आंदोलन केले. पो.कॉ. सुशील रामदास घुगे यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की महायुतीचे कार्यकर्ते आरोपी डॉक्टर निलेश सुरेश गडे , रवींद्र सूर्यभान पाटील, अतुल वसंतराव पाटील, सौ. चौधरी, उमेश फेगडे, हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, मुबारक तडवी, साहील तडवी व इतर 10 ते 12 असे एकूण 24 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दूध उत्पादकाच्या गाईचे दूध 30 रुपये लिटर भाव मिळावा तसेच इतर मागण्यांकरिता यावल शहरात टी पॉईंट जवळ रस्ता रोको करून येणारे जाणारे वाहन अडवून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कोरोना कोविड–19 चे नियमाचे उल्लंघन केले म्हणून 24 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध भाग.5 गु.र.नं. 131/2020 भा.द.वी.341,269,270,188 मु.पो. अक्ट 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन 135 प्रमाणे यावल पोस्टेला गुन्हा दाखल केला.पो.नि. अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पो.हे.कॉ. नितीन चव्हाण हे करीत आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात एक जिल्हा परिषद सदस्य, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, इत्यादी एकूण 24 ते 25 महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.