राष्ट्रीय

महिना अखेरपर्यंत इंधनदर वाढण्याची दाट शक्यता; पेट्रोल, डिझेल महागणार!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसंस्था)।:सध्या देशासमोर कोरोनाचे फार मोठे संकट उभे आहे, कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं कडक लॉकडाऊन लागू आहे.गेल्या वर्षभराच्या या परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला तर अनेकांचा रोजगार संकटात आला आहे.जनता आधीच कोरोना संकटामुळे त्रासली आहे,लोक हैराण झालेले असताना रोजगार नाही,दवाखाना खर्च,घरचा खर्च,त्यातल्या त्यात महागाई असे असताना अशा परिस्थितीत आणखी त्यात भर म्हणजे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसं झाल्यास वाहतूक खर्च जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल एव्हढे मात्र नक्की,

बाब एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात. मात्र ही वाढ एकदाच होणार नाहीत. ती हळूहळू होईल. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत इंधनाची मागणी घसरली आहे. सध्या खनिज तेलाच्या एका बॅरलची किंमत ६६ डॉलर इतकी आहे.पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये २७ फेब्रुवारीपासून वाढ झालेली नाही. त्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात इंधनाच्या दरात चारवेळा कपात झाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ पैशांनी, तर डिझेलचे दर ७४ पैशांनी कमी झाले. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९०.४० रुपये, तर डिझेलचा दर ८०.७३ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९६.८३ रुपये, तर डिझेलचा दर ८७.८१ रुपये इतका आहे, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन कंपन्या दर वाढवणार असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे. देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. पैकी ४ राज्यांमधील मतदान पार पडलं आहे. तर केवळ पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. त्यानंतर इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!