भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात ताडी विक्री जोमात : घातक रसायनांनी युवकांचे आयुष्य धोक्यात ! एकही ताडीचे वृक्ष नसताना नेमकी ताडी येथे कुठून

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यांत ताडी पिणाऱ्यांची संख्या वाढली असून तालुक्यात एकही ताडीचे वृक्ष नसताना नेमकी ताडी येथे कुठून व येत जरी असली तर ते बनवल्या जाते कुठे व कशा रसायनमार्फत बनवली जाते याकडे अन्न औषध विभाग व पुरवठा विभाग या संदर्भात लक्ष देत नसून हजारो लिटर ताडी मुक्ताईनगर शहरामध्ये सर्रासपणे अवैधरित्या विकली जात आहे

मुक्ताईनगर शहरांमध्ये तालुक्यामध्ये अथवा जवळपास असलेल्या राज्यांमध्ये ताडीचे एकही झाड उपलब्ध नसताना मुक्ताईनगर शहरांमध्ये ताडी हा मद्य नशेचा प्रकार कुठून येत आहे याकडे पोलीस प्रशासन या विभागाचे लक्ष नाही का ? शासनाने ताडीचे लायसन जरी दिले असले तरी ज्या ठिकाणी ताडेचे वृक्ष आहे ज्या ठिकाणी ताडी संदर्भात लागवड केली जाते त्या ठिकाणाहून ताडी पोहोचायला किती वेळ लागेल व किती टायमा संदर्भात ताडी पिण्या योग्य आहे नमुने वारंवार तपासणी साठी घेत असतात का असाही प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे जवळपास एकही झाड ताडीचे नसताना रोजच्या रोज एवढे ताडी येते तरी कुठून या मागचे कारण पोलीस प्रशासन व अन्न औषध विभाग यांनी का शोधले नाही यामागे अन्न औषध वाल्यांचे चांगलेच आर्थिक देवाण घेवणीचे हात भिजलेले दिसून येत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा वर्तवली जात आहे

आता ही ताडी नेमकी येथे तरी कुठून

मुक्ताईनगर शहरांमध्ये अवैध बोगस ताडी विक्री होत असून जीवाशी खेळणारा प्रकार हा होत आहे ताडी नेमकी कुठे बनवल्या जाते व कुठल्या स्वरूपात बनवली जाते हा प्रकार अद्यापही गुलदस्त्यातच बंद आहे ताडी पिणारा व्यक्ती याने जर एकही दिवस ताडी नाही पिली तर त्याच्या शरीराचे अवयव शरीराच्या मधून असे ताणले जात असून त्याला ना इलाजे त्या अवैध बोगस ताडीचे सेवन करायला ती ताडी भाग पाडत असते काही सूज्ञ नागरिकांचे यामध्ये असेही सांगण्यात येते की यामध्ये म्हशीच्या प्रजननाच्या वेळेस जे इंजेक्शन अथवा गोळ्या दिला जातात त्या इंजेक्शनचा व गोळ्यांचा वापर या ताडी मध्ये केला जातो जर अशी ताडी कित्येक नागरिक पीत असेल तर यामध्ये नपुसंकतेचा सुद्धा प्रकार काही दिवसांनी नागरिकांमध्ये आढळून येण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही तर अशी बोगस ताडी जर विक्री होत असेल तर प्रशासन याकडे लक्ष देतील का व अन्न व औषध विभागातील अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे ताडीचे बोगस दुकान बंद करणार का याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे
स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का व ताडी मुक्त मुक्ताईनगर करणार का ? व ताडी विक्रीवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्तीत केला जात आहे आहे

यामध्ये एक आईचा मुलगा एक पत्नीचा नवरा एक बहिणीचा भाऊ व देशाचा नागरिक असा एक जबाब दार व्यक्ती असून असा जबाबदार असलेला व्यक्ती व्यसनाचा नशा करून आपले आयुष्य तर बरबाद करतच आहे परंतु आपल्यावर अवलंबून असलेल्या आई,वडील, पत्नी, बहीण, मुलगा, मुलगी, असतील ते त्यांना पोर्क करून या जगाशी तो अखेरची झुंज देखील देत असल्याचे चित्र समोर आलेले आहे यामध्ये तरुण महिलावर्ग विधवा झालेल्या देखील दिसतात व म्हातारपणीचा सहारा म्हणून आई-वडील मुलाला लहानसे मोठं करतात व अशा व्यसनाधीनतेमुळे त्याचे कमी वयातच प्राण सोडावे लागत असून म्हातारपणाची काठी हिरावून घेतली जात आहे अशा केमिकल युक्त बोगस ताडी मुळे हा प्रकार घडत आहे तर शासनाने अशा बोगस ताडी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून ताडी विक्री बंद करून देशाचा नागरिक कुपोषित न करता वाचवायला हवे अशी अपेक्षा व्यसनाधीन तरुणांचे आई-वडील करत आहे

ताडी पिणारे नागरिक अचानक ताडी पिणे बंद केल्यास झोप न लागणे जेवण न जाणे चिडचिड होणे हातपाय थरथर कापणे अंगात असाह्य वेदना होणे डोकं दुखणे डोळे जळजळ करणे या अशा अनेक त्रासांनी त्रस्त होऊन पुन्हा ताडी पिण्यासाठी जावेच लागते अन्यथा हे होणारे त्रास कोणत्याही औषधाने कोणत्याही सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर कडून कितीही सलाईन अथवा औषधी गोळ्या घेतल्या तरी सदर वरील त्रास पासून मुक्तता होत नाही त्यामुळे या ताडीमध्ये काहीतरी नशिले अन नेसेसरी घातक केमिकल गोड्या पावडर टाकले जात असल्याची ताडी पिणाऱ्यांच्या नाते नातेवाईक व मित्र परिवारांची ओरड आहे सदर ताडीही स्वस्त असल्यामुळे गोरगरीब मजूर कास्तकार जास्त प्रमाणात ताडी पीत आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी ताडी पिणाऱ्या मुलाच्या दुखीत आई वडिलांकडून होत आहे व याकडे स्थानिक पोलिसांनी देखील लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेशा बाळगली जात आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!