मुक्ताईनगर मतदारसंघात मुहूर्तमेढ रोवलेल्या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेणारच– एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी प्रथमच कुऱ्हा काकोडा परिसरात दौरा केला यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ उपस्थित होते
यावेळी त्यांनी डोलारखेडा,नांदवेल, चिंचखेडा बु, वायला, महालखेडा, टाकळी, वडगाव, निमखेडी बु,बोदवड इच्छापूर ,चारठाणा येथे भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या या गावातील डोलारखेडा येथे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच सुरेश कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ,चिंचखेडा बु येथील सरपंच सौ भाग्यश्री ताई पिळोदकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,विकासो सदस्य, टाकळी येथे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वायला , इच्छापुर निमखेडी बु बोदवड महालखेडा, वडगाव यांच्यासह आदी गावातील शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला कुऱ्हा येथे एकनाथराव खडसे यांचे उपस्थितीत भाजप शहराध्यक्ष अवधुत भुते,मा, सरपंच ओमप्रकाश चौधरी यांच्यासह 300 कार्यकर्ते आणि सुळे, पारंबी,हलगोटा,लालगोटा येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी किसानसेल जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे,तालुकध्यक्ष यु डी पाटील सर,महिला आघाडी तालुकाध्यक्ष लताताई सावकारे,माजी सभापती दशरथभाऊ कांडेलकर, विलास धायडे, राजुभाऊ माळी,माजी जि प सदस्य सुभाष पाटील,ह भ प विशाल महाराज खोले, रामभाऊ पाटील,रविंद्र दांडगे, राजेश ढोले, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते
या वेळी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज प्रथमच आम्ही तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आलो आहोत आपणा सर्वांना विचारून आणि सल्ल्याने आम्ही पक्ष प्रवेश केला आहे गेले चाळीस वर्षांपासून आपण नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे आहेत असेच कायम उभे राहा आपल्या परिसराचे नंदनवन होण्यासाठी नाथाभाऊ यांनी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू केले आहे मागील सरकारच्या काळात आपल्याला निधी न मिळाल्या मुळे या योजनेचे काम बंद पडले आहे नाथाभाऊ यांच्या माध्यमातून आणि पाठपुराव्याने हे काम नक्कीच मार्गी लागेल आणि नाथाभाऊ यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकासरथ असाच दौडत राहील यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नाथाभाऊ, रोहिणी ताई यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मनापासून स्वागत करत आहेत नाथाभाऊ यांचे अभ्यासू नेतृत्व असल्या कारणाने त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये शासन दरबारी मोठे वजन आहे त्यामाध्यमातून आपल्या परिसरातील राहिलेले विकास कामे उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जातील
यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात गेल्या काळात भाजपाची सत्ता होती, तर जलसंपदा खाते गिरीश महाजन यांच्याकडे होते. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या भागातील कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन,बोदवड उपसा सिंचन ,मुक्ताई उपसा जलसिंचन या योजनांचे काम रखडले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पक्षाविषयी काय योगदान ? मी आमदार-़खासदार नसलो तरी माझ्यात काम करण्याची धमक आहे. कारण पक्ष प्रवेशाच्या वेळी शरद पवारांकडुन मी शब्द घेतला आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे,
मि स्पर्धेत असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचे नीच राजकारण करण्यात आले. ज्या पक्षाला मी लहानाचे मोठे केले तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे वाटले. मी पक्ष सोडला नाही मला सोडायला भाग पाडले, असे एकनाथराव खडसे म्हणाले. तालुक्यातील कुर्हा परिसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.
खडसे पुढे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिले, असे सांगितले जाते. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे दिली आहेत. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी उभा राहिलो आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझी छळणूक सुरुच राहीली.मी पक्ष सोडला काय चुक केली, अन्याय होत असतांना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते, म्हणून निर्णय घ्यावा लागला. पक्षाने एका व्यक्तीचे लाड केल्याने संपूर्ण महारष्ट्राच वाटोळे झाले आणि मिळणार असलेली सत्ताही गेली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मला तिकीट मिळणार नाही हे भाजपचे राष्ट्रीय समन्वयक असलेले डॉ. राजेंद्र फडके हे माझ्या व्याह्यांना आधीपासुन सांगत होते. मला तिकीट मिळणार नाही हे यांना कसे अगोदरपासून माहित होते ? अगोदर कोणत्या बैठकीत कट केला असेल तरच ते होऊ शकते. आपली भाजपाच्या विरोधात नाराजी नाही, फक्त एकात व्यक्तीबाबत आहे, असे एकनाथराव खडसे म्हणाले. कुऱ्हा परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पहायला मिळाले