भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमताज्या बातम्याबोदवळमुक्ताईनगर

मुक्ताईनगर माजी सभाापती हत्या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; जळगाव गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या !

जळगाव(प्रतिनिधी) : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या हत्येप्रकरणी इंदौरमधील कुविख्यात आरोपी कार्तिक टोपलिया उर्फ सुपड्या जाधव (24, 21, ब्लॉक सी.दिग्वीजय मंडी, इंदौर) यास जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून अटक केली आहे. आरोपी कार्तिक हा हिस्ट्रीशीटर निलेश गुरचळचा मित्र असून दोन महिन्यांपासून नाडगावातच निलेशकडे मुक्कामी होता तर 17 जून रोजी हत्येनंतर तो इंदौरमध्ये पसार झाला होता. कार्तिक हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरुद्ध मध्यप्रदेशात भादंवि 324 चे तीन तर भादंवि 420 चा एक, तसेच आर्म अ‍ॅक्ट व दारूबंदीचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, मुक्ताईनगर निरीक्षक सुरेश शिंदे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माधवराव पाटील, हवालदार विजय पाटील, नरेंद्र वारूळे आदींच्या पथकाने आरोपीच्या इंदौरमधून मुसक्या आवळल्या.

माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या हत्येप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्करराव पाटील, विलास रामकृष्ण महाजन (दोन्ही रा.कुर्‍हाकाकोडा), सैय्यद साबीर सैय्यद शफी (नवीन मशीदजवळ, कुर्‍हा), निलेश ईश्‍वर गुरचळ (नाडगाव, ता.बोदवड), अमोल मुरलीधर लवंगे (नाडगाव, ता.बोदवड) या पाच आरोपींना अटक झाली होती तर आता इंदौरमधील कुविख्यात आरोपी कार्तिक यास अटक झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!