मुक्ताईनगर व बोदवड मंडळाचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)। मुक्ताईनगर, बोदवड मंडल चे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग 3 व 4 डिसेंबर रोजी शिरसाळा, ता. बोदवड येथे पार पडले. याप्रसंगी उदघाटन खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. माजी जिप अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, अनंतराव कुलकर्णी, डी एस चव्हाण सर, तरुण भारत माजी संचालक राजेंद्रदादा नन्नवरे, रसाल दत्तात्रय पवार, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमाताई तडवी, ज्येष्ठ नेते शांताराम आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस विजय कुमार धांडे, प्रभाकर भाऊ महाजन, सुपडू दादा जंजाळ, डॉ अतुल सरोदे यांनी कालच्या पाच सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आज सत्राचा समारोप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी माजी आमदार स्मिताताई वाघ, संतोष समाधान सोनोने, सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, दीपक साखरे भाजप सरचिटणीस, माजी तालुकाध्यक्ष किशोर महाजन, ओबीसी सेल प्रदेश अजय भोळे, पंस सदस्य राजेंद्र सावळे, माजी जिप सभापती व किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, दिलीप भाऊ घुले यांनी आजच्या सत्रात मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, भारताची मुख्य वैचारिक धारा, भारताचा इतिहास व विकास, 2014 नंतरच्या भारतीय राजकारणातील बदल, आत्मनिर्भर भारत या प्रमुख विषयांवर प्रमुख व्यक्त्यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी सर्व जिप सदस्य, पंस सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.