भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

मैत्रीच्या नात्याला काळिमा …अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगत मित्राच्याच पत्‍नीवर अत्‍याचार..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चाळीसगाव (प्रतिनिधी)। मित्राच्याच पत्‍नीला तुझे अश्‍लिल व्हिडीओ माझे कडे आहे असे सांगून ते जर डिलीट करायचे असतील तर भेटायचा ये; असे धमकवण्याच्या सुरात बोलून बोलावले आणि मित्राच्या पत्नीवर अत्‍याचार केल्‍याची मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चाळीसगाव मध्ये उघडकीस आली.

या बाबत अधिक माहिती अशी की ,चाळीसगाव शहरातील २२ वर्षीय विवाहितेवर पतीच्या मित्रानेच अश्लील व्हिडीओ चे कारण दाखवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी ता.२९ रात्री घडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून घाट रोड परिसरात तीन मुलांसह पती,पत्नी वास्तव्यास भंगारचा व्यावसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्‍यांच्याच परिचयातील मित्राचे नेहमी त्याच्या घरी नेहमी ये-जा होत असे.ता,२९एप्रिल गुरूवारी रोजी रात्री आठच्या सुमारास मित्र भांडी आणण्यासाठी घरा बाहेर गेला असता याच दरम्‍यान त्याचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर ,रा. कादरीनगर याने त्याच्या पत्नीला फोन करून तुझे अश्‍लीत व्हिडीओ व फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. ते डिलीट करायचे असतील तर पाण्याच्या टाकीच्या पाठी मागील शेतात ये असे धमकावत मित्राच्या पत्नीला बोलावले.घाबरून जाऊन संबंधीत विवाहित महिला रात्री साडेआठच्या सुमारास निजाम शेख याने बोलाविलेल्‍या ठिकाणी गेली असता निजाम शेख याने मोबाईल न दाखवता महिलेवर अत्याचार केला. आणि याच वेळी विवाहितेचा पती आल्‍याने मुजावर तेथून पळून गेला . यानंतर पिडीते विवाहितेने लागलीच पतीसह शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. सदर महिलेच्या फिर्यादी वरून निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!