मोठा वाघोद्यात कोरोनाचा कहर सुरु पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह एकाच घरातील आई व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह !
मोठा वाघोदा ता.रावेर(प्रतिनिधी): येथील सातबाजार चौक परिसरातील एका ४९ वर्षीय पुरुषाचा तर ७१वर्षीय महिला (आई) या दोघांचा अहवाल आज ७ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला असून सदरील व्यक्ती राहत असलेला डेली मार्केट सातबाजार परिसर सील करण्यात आला आहे तसेच त्यांच्या कुटूंबातील दोन व्यक्तींना पत्नी व मुलगा यांना जे.टी.महाजन कॉलेजमधील कोविड १९ सेंटरला स्वॅब तपासणी कामी क्वारंटाईन करण्यात आले आहेत.तसेच वार्तालाप चौकातील बाधिताचे एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला असून कुटूंबातील उर्वरित सदस्यांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
सर्वप्रथम ८ जून रोजी पाहिला कोरोनाबाधित रुग्ण मोठा वाघोदा येथे आढळून आल्यानंतर सलग दोन मयतांसह एकूण १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते मात्र योग्य उपचार पद्धती व नागरिकांच्या खबरदारी ने कोरोनाची साखळी तर तुटली होती मात्र उर्वरित ११ रुग्णांनीही कोरोनावर मात करून गाव कोरोनामुक्त झाले होते मात्र कोरोनामुक्त झाले म्हणजे सर्व संपले या गुमानीत न राहण्याचे भाकित वर्तविण्यात आले असतांनाही सोशल डिटंन्सिन चे नियम धाब्यावर बसवत शासनादेशांचा फज्जा उडवित प्रतिबंधात्मक कारवाई , ठोस उपाययोजना न केल्याने मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच तथा अध्यक्ष कोरोना बचाव समितीचे विद्यमान अध्यक्ष यांनीच ग्रामपंचायतीकडे फिरविलेली पाठ व केलेले दुर्लक्षासह बेजबाबदारपणा कर्तव्यात कसूर कामचुकार कार्यपद्धती आणि विशेष गांव सोडून परगावी रहिवास अशा अनेक कारणांमुळे आज कोरोनामुक्त जाहीर झालेल्या मोठा वाघोदा गावात कोरोना संकटाने प्रवेश करीत गावास पुन्हा विळख्यात घेतले आहे आता बाधित उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 3 आहे आणि दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तरी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी मोठा वाघोदा वासियांतून होत आहे संबंधित प्रशासनाकडून काय प्रतिबंधात्मक उपाययोजना व कारवाई करण्यात येते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.