भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

मोठा वाघोद्यात कोरोनाचा विस्फोट सोशल डिटंन्सिन चां फज्जा, रुग्ण संख्या १३ वर ग्रामपंचायत सदस्य बाधित !

मोठा वाघोदा.ता.रावेर(प्रतिनिधी)। गावांतील कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला आलेख वार्तालाप चौक४ सातबाजार३ आता आंबेडकर नगरातही कोरोनाचा कहर पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या १६ लहान-मोठे व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १० जणांचा अहवाल निगेटिव्ह तर उर्वरित ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात एका १ व ४ वयोगटातील दोन मुलांचा आणि सातबाजार डेलीमार्केट परिसरातील बाधित कुटुंबातील आणखी तिसर्या महिलेचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे

प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र सील करण्यात आला आहे मात्र कंन्टेंटमेंट झोन झेत्रासह परिसरात सोशल डिस्टंन्सिन चां पुर्णच फज्जा उडालेला आहे किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते,दुध विक्रेते,मटन मासे,चिकन सेंटर,भजे,समोसे, गुलगुल्यांचे विक्रीचे ठेले व नागरिकांनी शासनादेश, नियमावली सामुहिक सुरक्षितता, तोंडावर मास्क न बांधता सोशल डिस्टंन्सिन चे उडविलेले धिंदवडे सर्वत्र एकच गर्दी होत धूम मची है धूम असल्याने महिनाभरापूर्वी दोन मयतांसह ११कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते व त्यांनी कोरोनावर मात करुन विजय मिळविला होता आणि मोठा वाघोदा कोरोनामुक्त केले होते

मात्र कागदोपत्री कागदावरच कार्यरत कोरोना बचाव समिती व बेपत्ता झालेले लोकनियुक्त सरपंच गांव सोडून परगावचे रहिवासी झाल्याने कोरोना बचाव समिती अध्यक्षासह समिती चे कामही कागदावरच बेजबाबदारपणा कर्तव्यात कसूर, मुद्दाम दुर्लक्ष जबाबदारीची जाणूनबुजून हेतूपुरस्सर टोलवाटोलवी केल्यामुळेच कोरोना संकटाने मोठा वाघोदा गावात पुन्हा शिरकाव करीत आठवडाभरात एकदम कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढून विस्फोट होत पुन्हा रुग्ण संख्या १३ वर यैऊन पोहचला आहे तरी नूतन जिल्हाधिकारी, कमांडंट ऑफिसर प्रांताधिकारी फैजपूर, तहसिलदार गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी रावेर, यांनी लक्ष देवून कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी सक्षम उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!