मोठा वाघोद्यात पुन्हा ३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह; सक्षम उपाय योजनेसाठी सर्व पक्षिय बैठकीचे आयोजन !
मोठा वाघोदा ता.रावेर(प्रतिनिधी) । येथील वार्तालाप चौक परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील दि.५ जुलै रोजी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कोरोना बाधित रुगणाच्या कुटुंबातील ३ निगेटिव्ह तर ३ पॉझिटिव्ह युवक वय २९ व दोन महिला वय ३४ व २४ वयोगटातील आणखी ३ जणांचा कोरोना अहवाल आज दि.८ जुलै रोजी पॉझिटिव आला असून याच कुटुंबातील उर्वरित ३ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत यामुळे कोरोनाबाधित संख्या ६ वर पोहोचल्यामुळे गावात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच ग्रामपंचायतीचस रामभरोसे सोडत गांव सोडून परगावी रहिवास करणार्या सरपंच तथा अध्यक्ष कोरोना बचाव समिती यांचे निष्क्रियतेबद्दल गावकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे कोरोनामुक्त जाहीर झालेल्या मोठा वाघोदा गावात कोरोना संकटाने प्रवेश करीत गावास पुन्हा विळख्यात घेत कहरच सुरू केला आहे आणि दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत कोरोना बाधितांची संख्या ६ वर पोहोचली आहे तरी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम उपाय योजना करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे असून या महा संकटाचे संकृरमण कसे थांबवता येईल यासाठी प्रशासनाकडून कोणत्या प्रतिबंधात्मक,सक्षम उपाययोजना करता येतील याकामी ग्रामपंचायतीसह गावातील जेष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व पक्षिय पदाधिकारी व सुज्ञ नागरिक यांनी दि ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रकाश विद्यालयातील सभागृहात बैठक आयोजित केलेली आहे तरी सर्व प्रतिष्ठित मार्गदर्शक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच,तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी यांनी केले आहे