भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रयावल

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन्य प्राण्यांच्या परप्रांतीय शिकाऱ्यां कडुन वनरक्षकांवर गोळीबार.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

यावल ( सुरेश पाटील)
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय१०ते१५जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करंजपाणी या परिमंडल कक्ष०३ क्रमांक१०४मध्ये दि.११एप्रिल रोजी दुपारी ३,४० वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता मागील चार वर्षापासुन वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ वय २७ वर्ष हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा,काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा,अश्रफ मुराद तडवी, वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र आम्ही लंगडा आंबा क्षेत्रात गस्त करीत असतांना त्या ठिकाणी १०ते १५ अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले व त्या टोळक्यातील लोकांनी आमच्याकडे पाहुन घटनास्थळा पासुन पळ काढला आम्ही सर्व त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता,त्या टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने आमच्यावर झाडा आळलपुन तुम्ही लोक आम्हाला शिकार करू देत नाही असे जोरा जाराने ओरडुन आमच्या दिशेने दोन फैरी गोळीबार करून आम्हास जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणाहुन जंगलाच्या मार्गाने परप्रांतात पळुन जाण्यात यशस्वी झाले.त्या वेळेस आमच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याने आम्ही सर्व झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले आमच्याकडील मोबाईलला रेंज नसल्याने कुणाशीही संपर्क करता आले नाहीत नंतर काही अंतरावर असलेल्या शेणपाणी सरंक्षणकुटी जावुन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी तात्काळ दुरध्वनीव्दारे कळविले असता त्यांनी आम्हास तात्काळ लंगडाआंबा मुख्यालयात बोलविले नंतर वरिष्ठांच्या आदेशाने अतिदुर्गम असा खडतर मार्गाने यावल येथे येवुन पोलीसात विजय गोरख शिरसाठ वनरक्षक करंजपाणी यांनी त्या अज्ञात १oते१५ परप्रांतीय जणांचे टोळके हे बेकाद्याशीर शिकारच्या उद्धीष्ठाने फिरून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्याची फिर्याद दाखल केली असुन,या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अमलदार सुशिलघुगे,भुषण चव्हाण,असलम खान हे करीत असुन,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!