यावल तालुक्यातील मालोदसह पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी महावितरणच्या अनागोंदी कारभाराने हवालदिल.
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील मालोद वाघझिरा शेतशिवारातील विद्युत डिपी गेल्या २० दिवसा पासून वाघझिरा ३ ची डिपी ऑइलची लेव्हल कमी झाल्याने जळून गेली, अनेक प्रयत्ना १० दिवसानंतर डिपी मिळाली पण त्या भागातील वायरमनने शेतात पिक उभे आहे असे सांगितले त्यामुळे आलेली डिपी परत पाठविण्यात आली, कारण वायरमन दिपक पाटील हे पाचोरा येथून किनगाव येथे अपडाऊन करतात ते मुख्यालयी हजर न त्या वेळेस पाचोरा येथे असल्याने ती डिपी ताब्यात घेतली नाही, नंतर पुन्हा अथक परिश्रमा नंतर दुसरी डिपी ८ दिवसा नंतर मिळाली, ती डिपी फक्त दोन दिवस चालली व पुन्हा बंद झाली, ती डिपी बदलून मिळण्यास पुन्हा १० दिवस गेले, या काळात पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराने हवालदिल झाले असून शेतकरी राजा अगोदरच आसमानी संकटात सापडला आहे व अक्षरशः विविध दुःखा त भरडून निघालेल्या अवस्थेत आहे तोंडी येणारा हा घासही महावितरणच्या हेतूपुरस्सर दुर्लशामुळे हिरावण्याची दाट शक्यता आहे विद्युत महावितरण संबंधित विभागाच्या वायरमन ला डिपी बद्दल विनंती करीत विचारले असता “तुम्हाला काय करायचं ते करा”अशा भाषेत उत्तर दिले, यावरून असे दिसून येते की पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी याचा कोणताही विचार केला जात नाही, अशा घटना वारंवार घडत आहेत याचा विचार प्रशासनाने नक्कीच करावा अन्यथा आदिवासी शेतकरी यांना आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही नसल्याची भावना यावल तालुक्यातील आदिवासी पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे