यावल तालुक्यात आज १० जणांना कोरोनाची बाधा !
यावल (प्रतिनिधी) । यावल तालुक्यातील आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात तालुका प्रशासनाला १० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात २ महिलांचा तर ८ पुरुषांचा समावेश आहे
आज आलेल्या अहवाला मध्ये तालुक्यातील १० रुग्णांमध्ये बामनोद २ पुरुष, सांगवी २ पुरुष, डांभूरणी येथील २ महिला व १ पुरुष, कोरपावली १ पुरुष, दहिगाव १पुरुष व नायगाव १ पुरुष रुग्णांचा समावेश आहेत तर तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर गेली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.