यावल तालुक्यात आज ७ जणांना कोरोनाची बाधा; रुग्ण संख्या ४०० च्या उंबरठ्यावर !
यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात तालुका प्रशासनाला ७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात सातही पुरुषांचा समावेश आहे
आज आलेल्या अहवाला मध्ये तालुक्यातील ७ रुग्णांमध्ये किनगाव २, न्हावी १, डोंगर कठोरा १, दौडगाव १, चिखली १, सावखेडा १, अशा पुरुष रुग्णांचा समावेश तसेच तालुक्यातील बाधित रुग्ण संख्या ३९७ झाली असून दिवसेंदिवस संख्या वाढत चालल्याने चिंता वाढत आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.