यावल तालुक्यात आज ८ जणांना कोरोनाची बाधा तर आधीच्या बाधित रुग्णांचा मृत्यू !
यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात तालुका प्रशासनाला ८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात ३ महिलांचा तर ५ पुरुषांचा समावेश असून तालुक्यातील आधी बाधित आलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे
आज तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवाला मध्ये तालुक्यातील ८ रुग्णांमध्ये फैजपुर शहरातही २, बामनोद २, डोंगर कठोरा २, भालोद १, व दौडगाव १ रुग्णांचा समावेश असून यांमध्ये ३ महिला व ५ पुरुष आहेत, तसेच तालुक्यातील आधी बाधित आढळून आलेला माहेलखेडी गावातील एका रुग्णांना मृत्यू झाला आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.