यावल तालुक्यात पश्चिमेकडून पूर्व भागात वाळूची मोठी तस्करी,मंडळ अधिकारी संबंधित तलाठी यांची निष्क्रीयता.सर्कल, तलाठी मुख्यालयी राहत नसल्याचा विपरीत परिणाम.
यावल (सुरेश पाटील)। तालुक्यात 6 पैकी 5 मंडळातून वाळूची अवैध वाहतूक तस्करी खुलेआम सर्रासपणे सुरू आहे (यावल मंडळ वगळता कारण यावल मंडळात सर्कल आणि तलाठी सतत वाळू वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई करीत आहे आहे ) परंतु काही सर्कल आणि तलाठी यांचे खास विश्वासातील पंटर आणि मध्यस्थीने वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्टर चालकांशी संगनमत करून मासिक हप्ते निश्चित करून अवैध वाळु वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांच्या खांद्यावर कारवाईची बंदूक ठेवून एकूण 6 मंडळाधिकारी पैकी दोन मंडळ अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून यावल मंडळातील वाळू व्यवसायिकांना त्रास देऊन आपला प्रताप दाखवित असल्याने काही कॉन्ट्रॅक्टर आणि वाळू व्यवसायिकात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून ठोस कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. काल दिनांक 21 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास किनगांवकडून आलेला एक अवैध वाळूचा डंपर यावल शहरात पुरावा म्हणून आढळून आला.
तालुक्यातील पश्चिम विभागातील किनगांव मंडळ कार्यक्षेत्रातून संपूर्ण यावल तालुक्यात दररोज रात्रंदिवस गिरणा नदी पात्रातील वाळू ठराविक एक ते दोन डंपर तसेच इतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि कोळन्हावी जवळील तापी नदी पात्रातील आणि किनगांव परिसरातून साकळी, थोरगव्हाण, मनवेल, किनगाव, दहीगाव, सावखेडा, इत्यादी परिसरातील नदी-नाल्यांना मधील वाळू ट्रॅक्टर डंपरद्वारे अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे किनगांव मंडळातुन इतर सर्व मंडळात अवैध वाळू पोहोच सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना यावल मंडळ वगळता इतर कोणकोण सर्कल आणि तलाठी अवैध वाळू वाहतूक करणार्यांना सर्वतोपरी सहकार्य करतात याची चौकशी यावल तहसीलदार यांनी केल्यास अवैध वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे अवैध वाळू तस्करीत कोणी तरी दरमहा तीन हजार रुपये प्रत्येक ट्रॅक्टर चालकाकडून तर पाच ते सहा हजार रुपये प्रत्येक डंपर चालकाकडून कोण वसूल करीत आहे आणि आणि यात कोणते सर्कल आणि तलाठी यांचा सहभाग आहे का ? आणि सहभाग नसेल तर अवैध वाळू वाहतूक दारांवर किनगांव मंडळात दंडात्मक कार्यवाही का झालेली नाही ? तसेच किनगांव मंडळात अवैध वाळू डंपर आणि ट्रॅक्टर वाहतूक दारांवर दंडात्मक कारवाई का झालेली नाही? याची चौकशी फैजपूर भाग प्रांताधिकारी यावल तहसीलदार यांनी केल्यास वाळू तस्करीचा मोठा गोरख धंदा करणाऱ्यांना आळा बसेल.
आणि अवैध वाहतूक प्रकरणाकडे आणि नियुक्त भरारी गस्ती पथकाकडे संबंधित नायब तहसीलदार यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे का ? असे किनगांव आणि साकळी मंडळात बोलले जात आहे.
किनगांव मंडळ अधिकारी आणि भालोद मंडळ अधिकारी यांनी आपले मूळ कार्यक्षेत्र वगळता आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात आणि कार्यक्षेत्रात किती वाळू वाहतूक तस्करांवर दंडात्मक कारवाई केली तसेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून इतर मंडळात किती वाळू तस्करांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे याची चौकशी केल्यास किनगांव आणि भालोद सर्कल यांच्या कर्तव्यदक्षतेचा मोठा प्रताप महसूलसह जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
महसूलच्या मनमानी कारभाराबाबत काही वाळू तस्कर हप्ते बाजीला म्हणजे लाच देण्यास वैतागले असून असून यावल तालुक्यात लवकरच लाचलुचपत विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. किनगाव मंडळ साखळी दहिगाव मंडळातून अवैध वाळू वाहतूक बाबत कडक बंदोबस्त करून मुख्यालयाच्या ठिकाणी न थांबणारे सर्कल तलाठी यांच्यावर धडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.