यावल तालुक्यात पुन्हा एक पोलीस पाटील निलंबित, कोरोना विषाणु रोग प्रतिबंधात्मक कारवाईचा परिणाम !
यावल दि.15 (प्रतिनिधी)। कामात एकनिष्ठ नसल्याचे तसेच पोलीस पाटील म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचे कारणावरून तालुक्यातील मनवेल येथील पोलीस पाटील सुरेश राजदार भालेराव यांना फैजपुर भाग उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी तत्काळ निलंबित केले असल्याचा आदेश आज दिनांक 15 जुलै 2020 बुधवार रोजी काढल्याने तसेच तालुक्यात गेल्या आठवड्यात म्हैसवाडी येथील महिला पोलीस पाटील आणि आता मनवेल येथील पोलीस पाटील निलंबित करण्याची कारवाई झाल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांचा दिनांक 15 जुलै 2020 चा आदेश प्रत्यक्ष बघितला असता त्यात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 14 /6 /2020 रोजी 12:30 वाजता श्रीमती प्रतिभा मोरे राहणार फैजपूर तालुका यावल ( जळगाव जिल्हा अनुसूचित जाती जमाती महिला अध्यक्ष ) यांनी विनापरवानगी व बेकायदेशीर रीत्या 60 ते 70 कार्यकर्त्यांसह कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाउनच्या व संचार बंदी बंदीच्या काळात मास्क न लावता सभा घेतली सदर घटनेच्या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला भाग-6 गुन्हा रजिस्टर नंबर 55 / 2020 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नमूद केल्याप्रमाणे सभेबाबत सुरेश राजधर भालेराव पोलीस पाटील मनवेल या नात्याने पोलीस स्टेशनला माहिती देणे अपेक्षित असताना पोलीस स्टेशनला भालेराव यांनी कोणत्याही प्रकारे कळविले नाही किंवा सदर सभेवर कोणत्याही प्रकारचा आषेप घेतलेला नसल्याने सुरेश राजधर भालेराव पोलीस पाटील मनवेल तालुका यावल सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आलेले आहे.
यावरून सुरेश राजधर भालेराव पोलीस पाटील मनवेल हे त्यांना सोपविलेल्या कामकाजामध्ये एकनिष्ठ नसल्याचे सिद्ध होते कोविड -19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत मनवेल गावातील विनापरवाना सभेबाबत पोलीस स्टेशनला न सांगणे व अशा सभेमध्ये सहभागी झाल्याने भालेराव पोलीस पाटील मनवेल यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न होते.
इत्यादी कारणावरून महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979 नियम 4 च्या पोटनियम तसेच उपोदघताटील अ.क्र.2 चे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 9 व 11 अन्वय प्रधान केलेल्या शक्तीचा वापर करून तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार सुरेश राजधर भालेराव पोलीस पाटील मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव यांना या आदेशाचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार वीस पासून पुढील आदेश पावेतो तत्काळ निलंबित करीत आहे असा आदेश प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी आज दिल्याने संपूर्ण तालुक्यात पोलीस पाटील वर्गात एकच खळबळ उडाली आहे.