भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल मध्ये सोयीनुसार चमकोगिरी! कामकाज मात्र समाधान कारक: जनजागृती खड्ड्यात, जनतेमध्ये संभ्रम कायम

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (सुरेश पाटील)। यावल शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासकीय यंत्रणेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कामकाज समाधानकारक आहे परंतु संबंधित काही अधिकारी-कर्मचारी जनजागृती खड्ड्यात घालून आपल्या सोयीनुसार चमकोगिरी करीत असल्याने तसेच पाहिजे तसे निर्बंध लावले जात नसल्यामुळे जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे,तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावल शहरासह संपूर्ण यावल तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू न देण्याच्या कार्यवाहीत जनतेच्या माहितीसाठी एकाच वेळेला सर्व प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देऊन किंवा प्रसिद्धीपत्रक काढून आपल्या कामकाजाविषयी तसेच कोरोनाविषाणू संदर्भात जनजागृती करायला पाहिजे असे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

यावल शहरासह तालुक्यात लसीचे डोस देण्याची कार्यवाही सुरू आहे,कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याबाबत तसेच अन्टीजनिक चाचणी मोहिमेत आणि इतर तपासणीत किती स्त्री-पुरुष मुलं मुली मुली यांचे कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आले किती रुग्ण उपचार घेऊन घरी परत आले आणि किती रुग्ण मयत झाले ? यावल पोलिसांनी कोरोना प्रतिबंधात्मक आणि संचार बंदी संदर्भात तसेच दंडात्मक काय कारवाई केली? यावल महसूल विभागाने तसेच पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी आपल्या संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना विषाणू वाढू नये म्हणून काय काय उपाय योजना आणि पर्यायी व्यवस्था केली याबाबतची तसेच जनजागृती संदर्भातली माहिती अद्यापही प्रसिद्धीमाध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे न देता फक्त आपण केलेल्या काही नाममात्र कारवाईचा देखावा आणि चमकोगिरी केली आहे. त्यामुळे कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनस्तरावरून जनहिताचे नेमके कोणते कामकाज संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या विभागाकडून करीत आहे किंवा नाही जनतेच्या माहितीसाठी काय कार्यवाही करण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी जळगाव फैजपुर भाग प्रांताधिकारी यांनी आपल्या यावल तालुक्यातील संबंधित सर्व यंत्रणेला आदेश वजा सूचना देऊन जनतेच्या माहितीसाठी वेळोवेळी एकाच वेळेला प्रसिद्धीपत्रक काढून जनजागृती करावी कारण आतापर्यंत यावल तालुक्यात कोरोनाविषाणू संदर्भात काही चांगली कामे काही ठराविक कर्मचाऱ्यांनी केली परंतु त्याची प्रसिद्धी करण्यात आली नाही त्यांच्या चांगल्या कार्याची प्रसिद्धी केली असती तर जनतेमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती झाली असती काही ठराविक अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या सोयीनुसार चमकोगिरी करणार नाहीत असे सुद्धा संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

चहापाणी आणि ओळख कोरोनापासून मुक्त आहे का?-
यावल शहरात काही ठराविक नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी कोरोनानियमाचे अतिकडक निर्बंध आहेत, तर देशी दारू आणि गावठी दारू विक्री या ठिकाणी आणि ग्राहकांसाठी तसेच यावल एसटी स्टँड आवारात आणि यावल पोलीस स्टेशन समोर चहापाणी गुटखा सर्रास विक्री होत आहे हे बिनधास्त म्हणतात की आम्ही एस.टी.कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना चहापाणी प्रत्यक्ष पाजत असतो, त्याचप्रमाणे खानावळ रेस्टॉरन्ट याना फक्त पार्सल ची परवानगी आहे असे असताना रात्री उशिरापर्यंत काही हॉटेल रेस्टॉरंट खानावळ मध्ये जेवणाचा आणी पिण्याचा कार्यक्रम सर्रास सुरु आहे तसेच देशी-विदेशी दारूची दुकाने सुदधा बिनधास्त पणे उघडे ठेवून विक्री केली जात आहे,या ठिकाणी माक्स व सोशल डिस्टन्स खड्ड्यात घातले जात आहे हो म्हणतात की आमच्या वर कोणीही काहीही कारवाई करू शकत नाही, यावल न.पा. कर्मचारी व यावल पोलीस काही ठराविक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून (यावल नगरपरिषदेच्या पावती पुस्तकातील) कायद्याचा धाक दाखवीत असल्याने नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने पक्षपातीपणा व भेदभाव न करता कारवाई करावी असे सुद्धा बोलले जात आहे.याठिकाणी माक्स व सोशल डिस्टन्स खड्ड्यात घातले जात आहे हो म्हणतात की आमच्या वर कोणीही काहीही कारवाई करू शकत नाही, यावल न.पा. कर्मचारी व यावल पोलीस काही ठराविक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून (यावल नगरपरिषदेच्या पावती पुस्तकातील) कायद्याचा धाक दाखवीत असल्याने नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने पक्षपातीपणा व भेदभाव न करता कारवाई करावी असे सुद्धा बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!