यावल महा ई सेतू सुविधा केंद्रावर मनमानी कारभार
कोरपावली ता.यावल (प्रतिनिधी)। यावल येथील महा ई सेवा सुविधा केंद्रावर मनमानी कारभार केला जात असून कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
अधिक वृत्त असें की, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस महा ई सुविधा केंद्र सरकार मान्य आहे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलों असता त्यांना उत्पन्न दाखला काढण्याची फी विचारली असता तेथील कर्मचारी सचिन चौधरी यांनी चक्क 100 रुपये सांगितले यास इतकी रक्कम देण्यास नकार दिल्याने त्यानी आधार कार्ड प्रिंट काढण्यास ही नकार देत प्रिंटर खराब असल्याचे सांगितले माझ्या समोरच एक आधार कार्ड कडुन देत असताना मशीन बंद झाले दुसरी कडून काढा तुम्ही माझ्याकडे आधार कार्ड काढले नाही माझ्या कडे काढले असते तर मी लगेच काढून दिले असते, उत्पन्न दाखला फी वाढीव होत असल्याचे विचारले असता त्यानी उद्धट पणे अप शब्द वापरून वाद घातला सरकारमान्य सुविधा केंद्र असताना यात कर्मचारी आपल्या मर्जीने वाढीव फी घेत असल्याचे चित्र दिसत असून नागरिकांची पिळवणूक करीत असताना आमचे कोणीच काय करू शकत नाही तू कुठेही जा असे शब्द या ठिकाणी वापरले जात असून अश्या उर्मट व्यक्तीला कुणाचा आशीर्वाद लाभला आहे यावल तहसीलदार यांनी चौकशी करून संबधीतांवर कारवाई करावी .