यावल येथे रेशनिंगचा काळाबाजार चौकशीची मागणी !
शब्बीर खान
हिंगोणा ता.यावल (प्रतिनिधी): जिल्हा अध्यक्ष अँड संदीप भैय्यासाहेब पाटील रेशनिंग कमीटी अध्यक्ष प्रदीप पवार आमदार शिरीष दादा चौधरी जि प गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका रेशनिंग कमीटी तयार करण्यात। आल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात जिल्हा रेशनिंग कमीटी सदस्य चंद्रकलाताई इंगळे व तालुका रेशनिंग कमीटी सदस्य कदीर भाई अनील जंजाळे हाजी गफ्फार शेट हे सुद्धा यावल रेशनिंग दुकानात जाऊन स्वत पाहणी करत आहे त्याच ठिकाणी यावल रेशनिंग दुकान नं १२४ जोसाबाई सुपडु गजरे या दुकानात काळा बाजार चालू आहे असे लाभार्थींना दिसून आले सदरील दुकानदार शासनाने दिलेला मोफ़त धान्य लाभार्थ्यांना वाटप व्यवस्थित करत नाही, प्रत्येक लाभार्थींना दर महा चना दाळ/तुर डाळ १ कीलो वाटप केली गेली पाहिजे परंतु सदरील दुकानदार तीन महिन्यातुन एकच किलो दाळ देत असतो व उरलेली दोन किलो दाळ देत नाही अस्या लाभार्थ्यांच्या तक्रारी आहे. त्याला बोलायला गेले तर तो लाभार्थ्यांच्या अंगावर मारायला धावुन जातो आनी म्हणतो कोनी माझे काहीच करनार नाही अधीकारी लोकांना मी माझ्या खिशात घेवुन फीरतो अश्या धमक्या तो लाभार्थींना देतो असे यावल च्या लाभार्थ्यांनी कदीर भाई अनील जंजाळे हाजी गफ्फार शेट यांना सुध्दा सांगितले व त्यांनी स्वतः जावुन पाहणी केली या कोरोनाच्या महाभयंकर संकटात गरीब लोकांना तो धान्य वाटप करत नाही याची दखल वरिष्ठांनी घेवुन घटनेची चौकशी करून या दुकानाला सील करण्यात यावे व परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.