यावल शहरातील ते 2 चोरटे कोण? यावल शहरातील बांधकाम व्यवसायकाची चोरी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली कासोदा परिसरात सापडली !
ट्रॅक्टर मालकाची चुप्पी कशासाठी ?
यावल (सुरेश पाटील)। यावल शहरातील बोरावल गेट परिसरातून १४ ऑगस्ट २०२० शुक्रवार रोजी रात्री बांधकाम व्यवसायिका युसुफ समद पटेल यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीची ( ट्रॅक्टर नं.MH–19AP–9215, ट्राली नं. 8728 ) चोरी झाली होती.पोलीस तपासात यावल शहरातील बोरावल गेट भागातील 2 अज्ञात चोरट्यांनी एरंडोल कासोदा परिसरातील एका चोरट्याशी संगनमत करून ट्रॅक्टर व ट्रॉली यावल येथून चोरून नेली होती.
चौकशी अंती ते ट्रॅक्टर ट्रॉली काल दिनांक 29 ऑगस्ट शनिवार रोजी एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात आढळून आल्याने ते ट्रॅक्टर व ट्रॉली यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बोरावल गेट परिसरातील ते 2 अज्ञात चोरटे कोण आहेत याबाबत ट्रॅक्टर मालकाची चुप्पी कशासाठी आहे ? असे अनेक प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात असून त्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असे सुद्धा बोलले जात आहे.
बांधकाम व्यावसायिकाचे चोरीस गेलेले ट्रॅक्टर एरंडोल– कासोदा परिसरात सापडल्याने ही ट्रॅक्टर चोरी यावल येथील बोरावल गेट भागातील 2 चोरट्यांनी कासोदा येथील एका चोरट्याच्या ताब्यात दिले होते का ? यावल येथून चोरीस गेलेले ट्रॅक्टर कासोदा परिसरात कोणी नेले ? कासोदा परिसरात एका शेतात ट्रॅक्टर उभे असल्याची माहिती यावल पोलिसांना कोणी दिली ? यावल येथील ते 2 चोरटे कोण ? हे दोन चोरटे बोरावल गेट भागातीलच आहेत का ? यावल पोलिसांच्या तपासात त्या दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झालेली आहेत का ? यावल येथील या दोन चोरट्याची नांवे ट्रॅक्टर मालकाला सुद्धा माहित असल्याचे बोरावल गेट भागात बोलले जात असून त्या 2 चोरट्यांसह कासोदा येथील चोरा विरुद्ध यावल पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास त्या चोरट्यांची हिंमत वाढून पुन्हा यावल शहरासह तालुक्यातील ट्रॅक्टर व इतर वाहने चोरीच्या घटनां घडू शकतात यामुळे यावल पोलिसांनी वेळीच कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे संपूर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.