यावल शहरात मोफत आरोग्य तपासणीला उत्तम प्रतिसाद !
यावल (प्रतिनिधी)। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये तसेच फैजपूर विभागीय प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी.बी. बारेला, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांचे मार्गदर्शनाखाली यावल शहरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले त्यात संपूर्ण यावल शहरातील स्री-पुरुष नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
दिनांक 17 जुलै 2020 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता यावल नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यावल, तसेच यावल मेडिकल असोशियन यांचे तर्फे शहरातील बोरावल गेटजवळील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत, तसेच शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात, इंदिरा गर्ल्स हायस्कूल मध्ये सोमवार बुधवार शनिवारी सकाळी 11 वाजता आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.
त्याप्रमाणे दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आणि बाल संस्कार विद्यामंदिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर तपासणी शिबिरात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रांताधिकारी डॉक्टर थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी बबन तडवी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी, बी. बारेला सूर्यकांत पाटील, नगरपरिषदेचे विजय बढे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, योगेश मदने, पदाधिकारी मुबारक तडवी इत्यादी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिरात मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज वारके, डॉ. सतीश यावलकर, डॉ. तुषार फेगडे, डॉ. प्रविण पाटील, डॉ.पी.एच.पाटील, डॉ. सतीश अस्वार, डॉ. रमेश पाचपोळ, डॉ. श्रीकांत महाजन, डॉ. सरफराज तडवी, डॉ. योगेश गडे, डॉ. चंदन पाटील, डॉ. अभय रावते. डॉ. शेख मुक्तार, डॉ.वसीम, डॉ.ए.आर. देशमुख यांचेसह इतर खाजगी डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोफत तपासणी शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी केल्यानुसार आरोग्य तपासणी शिबिरात यावल शहरातील एकूण 162 रुग्णांनी लाभ घेतला. याकामी नगरपरिषद कर्मचारी मधुकर गजरे, सुनील उंबरकर, असरूल्लाखान, संतोष नन्नवरे, रवी काटकर यांनी परिश्रम घेतले.