भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यायावल

यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह बनले तळीराम व आंबटशौकीनांचे एकांतवास !

यावल (विशेष प्रतिनिधी)। यावल  येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह बनले आंबट शौकीनांचे बनले एकांतवासाचे ठीकाण विश्रामगृहाच्या ठीकाणी देखरेखी साठी वाचमन नसल्याकारणाने नको त्या गोष्टींचा कार्यकम टवाळ्खोर मंडळी कडुन होतयावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह बनले तळीराम व आंबटशौकीनांचे एकांतवास असल्याने या ठिकाणी काही अप्रिय घटना होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला असुन या प्रश्नाकडे सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वरिष्ठानी तात्काळ लक्ष देवुन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

यावल शहर हे तालुक्याचे एक प्रमुख शहर असुन शहरातील उतरेकडे बंद पडतेली जे .टी महाजन ही सुतगिरणी असुन त्याय बरोबर याच परिसरात शाळा विद्यालय व शासकीय आयटीआय असुन ही वर्दळीची केन्द्र गेल्या काही दिवसापासुन बंद असल्याने हे संपुर्ण परिसर निंमन्युष बनले असल्याचे पाहुन काही आंबटशौकीन तरुण तरूणी याच ठीकाणी बंद पडलेल्या यावल सार्वजनीक बांधकाम च्या कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय विश्रामगृहाचा त्पा ठीकाणाचा नको त्या कामासाठी मोठया प्रमाणावर दुरूपयोग करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडुन बोलले जात असुन , सदरच्या विश्रामगृहाच्या परिसरातील शासकीय मालमतेची मोठया प्रमाणावर नासघुसदेखील करण्यात आली आहे . शासकीय विश्रामगृहावर वाचमन नसल्याकारणाने सायंकाळच्या वेळीस तळीरामांना देखील चांगलेच फावले आहे.

जळगाव जिल्ह्यात अनेक ठीकाणी अतीथी गणांसाठी शासकीय विश्रामगृह आहेत मात्र यावल शहरातील विश्रामगृहासारखी ईतकी वाईट अवस्था कुठल्याही विश्रामगृहाची नसेल, दरम्यान शासकीय विश्रामगृहाची ही अवस्था गेल्या दोन वर्षापासुन अशी झाली असुन यावलच्या सार्वजनिक बांधकाम या प्रश्नाकडे गांर्थीयाने लक्ष देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा कारभारावर नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असुन , सा . बां . विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास काही अप्रीय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!