युवकाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
भुसावळ – तालुक्यातील कंडारी गावामधील २० वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक असे की, कंडारी येथील सम्राट कॉलनीतील रहिवासी संकेत अनिल कांबळे (वय-२०) दि. २३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फोनवर बोलत बोलत तापी नदी पात्रा नजीकच्या विहिरीकडे आला व अचानक त्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी परिसरातील मुलांनी ही घटना नागरिकांना कळविल्याने त्याला तासाभराच्या बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पो.नि. बाबासाहेब ठोंबे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामिण रुग्णालयात रवाना करण्यात आले याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.