राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन !
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.
राज्यसभेचे खासदार आणि समाजावादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दीर्घ निधन आजाराने आज निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. सिंगापूरच्या माऊंट एलीजाबेत हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष उपचार घेत होते. 2013 मध्ये त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली झालीच नाही.