राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.यावल शहरात इंग्लिश दारू सह 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, लॉक डाऊन मध्ये देशी-विदेशी मालाची विक्री झालीच कशी ? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष !
(सुरेश पाटील)
यावल(प्रतिनिधी) दि.१०: यावल शहरात बोरावल गेट परिसरातून काल दिनांक 9 गुरुवार रोजी यावल पोलिसांनी एका मोटरसायकल सह एकूण 16 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला असला तरी लॉकडाऊन च्या गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात सर्व बियरबार व वाइन सेंटर बंद असताना यावल तालुक्यात सह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात देशी-विदेशी दारू अनेक ठिकाणी अवैध रित्या खुलेआम विक्री झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे.
यावल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संध्याकाळी 17:45 वाजेच्या सुमारास बोरावल गेटजवळ सार्वजनिक जागेवर बंडू सुकलाल पाटील व गणेश शहाजी शिर्के राहणार बोरावल गेट अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने यावल पोलीस त्या ठिकाणी तात्काळ जाऊन त्यांचे ताब्यातील ऑफिसर चॉइस कंपनीच्या 180 एम. एल.मापाच्या 9 सीलबंद इंग्लिश दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत रुपये 650, तसेच 15 हजार रुपये किमतीची एक हिरो डीलक्स कंपनीची मोटरसायकल,आणि 540 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 180 एम. एल. मापाच्या 9 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 16 हजार 190 रुपयाचा माल जप्त करून गु.र.नं. 66 / 2020 कलम 65 ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी हे करीत आहेत.