रावेरमध्ये शिवसेनेला खिंडार : युवा सेना जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्तीत प्रवेश
रावेर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर आ.चंद्रकांत पाटील यांचे खंदे समर्थक समजले जाणारे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आज मंगळवारी अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला रावेरात खिंडार पडले आहे.
अकोला येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने जळगांव युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून यामध्ये तामसवाडी सरपंच नरेंद्र कोळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शिवसेना शेख लतीफ, युवासेना शहरप्रमुख रावेर मनोज वरणकर, शिवसेना शाखाप्रमुख निंभोरासिम प्रवीण चौधरी, उपशाखाप्रमुख शिवसेना गौरव पाटील, भूषण धनके, लीलाधर राजपूत, जीवन जाधव, जय राजपूत, भगवान कोळी निंबोल राजेंद्र पाटील आदींचा समावेश आहे.