भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवणुकीत ९५.६२ टक्के मतदान !

रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा| रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवणुकीसाठी ९५.६२ टक्के मतदान झाल असून तीन पॅनलच्या ५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेत्यानमध्ये बंद झाले आहे.

रावेर कृषी उपन्न बाजार समिती निवणुकीसाठी तीन पॅनल मध्ये लढत होत असून महाविकास आघाडी पुरुस्कृत शेतकरी विकास पॅनल तर भाजपा-सेना पुरुस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनल व जनशक्ती प्रहार पुरस्कृत परीर्वतन शेतकरी पॅनल तिन पॅनलसह अपक्षांमध्ये १८ जागांसाठी ५१ उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले आहे.

शहरातील यशवंत विद्यालयात सात बूथ वर मतदान घेण्यात आले. सात मतदान केंद्रावर मतदान पार पडले. २ हजार ६५२ मतदारां पैकी २ हजार ५३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोसायटी मतदार संघात ७४६ पैकी ७२७  मतदान झाले ९७.४५ टक्के त्यानंतर व्यापारी मतदार संघात  एकूण ७६३ पैकी ७०५  मतदान झाले ९२.३९ टक्के तसेच हमाल मापाडी २३४ पैकी २२६ मतदान झाले ९६.५८ तर ग्राम पंचायत मतदार संघात ९०९ पैकी ८७८ मतदान झाले ९६.५८ टक्के मतदान झाले.

२ हजार ६५२ मतदारांपैकी २ हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजे पासुन रावेर शहरतील स्वामी विवेकानंद शाळेत सात टेबलवर  सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!