भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर तालुक्यात आज ७ कोरोना तपासणी अहवाल बाधित !

रावेर (प्रतिनिधी)। आताच नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आज आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ७ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये उदळी येथील ३, विवरा येथील ३, तांदलवाडी येथील १ अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून तालुक्यातील आतापर्यंत ५८४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९६ च्या दरम्यान आहे, तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या आठशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला  आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!