रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या ५०० च्या उंबरठ्यावर !
रावेर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र सह जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात रावेर तालुका सुद्धा सुटलेला नाही, रावेर तालुक्यात सुद्धा दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज आलेल्या अहवालांमध्ये तालुक्यात रावेर शहरातील ५ , अटवाडा २ व सुदगाव, कुसुम्बा बु, विवरा खु.,अजंदा, अजनाड, धामोडी- प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळून आला असून तसेच सकाळी चिनावल ३, सावदा २, रोझोदा १ अशे रुग्ण बाधित आढळून आले होते. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला असून तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.
तालुक्यातील आता पर्यंत ४८० रुग्ण बाधित आढळून आले आहे, त्यापैकी ३२८ रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले आहे तर ३६ रुग्ण मयत असून ११६ रुग्ण उपचार घेत आहेत.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.