रावेर तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी होण्याच्या मार्गावर; २ अहवाल बाधित !
रावेर (प्रतिनिधी)। आताच नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आज २ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत आहे.
तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये केऱ्हाला १, चोरवड १ अशे दोन रुग्णांना लागण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून तसेच रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाघाडी २ तर खिर्डी १ अशे तीन अहवाल बाधित आढळून आले होते. तालुक्यातील कोरोना संक्रमण कमी होत असल्याचे दिसत असून कोरोना बधितांची संख्या घटत असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ७१८ झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.