रावेर तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या हजारच्या उंबरठ्यावर; ३० तपासणी अहवाल बाधित !
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून तालुक्यात गेल्या १२ तासांत आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३० अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये केऱ्हाळा १३, गहुखेडा ९, कुंभारखेडा ४, रावेर १, सावदा १, सावखेडा १, एनपूर १ अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले असून तालुक्यातील आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ९९० झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे