रावेर तालुक्यात आज ११ रुग्णांना कोरोनाची बाधा !
रावेर (प्रतिनिधी)। आताच नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ११ अहवाल बधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये रावेर शहर ३, विवरा खुर्द १, कुसुम्बा बुद्रुक ३, उदळी खुर्द २, विटवा १, खानापूर १ अशे रुग्णांचे अहवाल तालुका प्रशासला आलेल्या अहवालात बाधित आढळून आल्याचे प्राप्त झाले आहे. तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ५६२ झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.